मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर भाजपने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. रविवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भाजपा प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेद्र यादव, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे हे नेते या बैठकीला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी, आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरण्यात आले.















Discussion about this post