मुंबई । राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीचं सरकार सत्तेत आलं. परंतु या सरकारमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. अशातच भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एक धक्का दिला आहे. तो म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंजूर केलेलं टेंडर भाजपकडून रद्द करण्यात आलं आहे.
पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्काय वॉक बांधकामांचे १२९ कोटी रूपयांच्या टेंडर रद्द करण्यात आल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.नुकतंच महापालिकेकडून जवळपास १४०० कोटींचं प्रकल्प रद्द करण्यात आल्यानं शिंदेंना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पासाठी जोर लावून धरला होता. मात्र, हा टेंडर रद्द केल्यानंतर आणखी एक टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे.
महापालिकेकडून टेंडर रद्द केल्यानंतर, आता पंढरपुरातील दर्शन मंडपाचे १२९ कोटी रुपयांचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय बांधकाम खात्यानं घेतला आहे. मागील आषाढी यात्रेच्यावेळी तत्काळीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली होती.
मात्र, दर्शन मंडपाच्या १२९ कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. अचानक दर्शन मंडपाच्या १२९ कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर रद्द करण्यात आल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
Discussion about this post