उत्तरप्रदेशातून एका संतापजनक बातमी समोर येत आहे. ज्यात भाजप जिल्हाध्यक्षाचा महिला कार्यकर्त्यासोबतचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमर किशोर कश्यप असं या भाजप जिल्हाध्यक्षाचे नाव असून व्हिडिओ व्हायरल होताच पक्षाने नेत्याविरोधात कारवाई केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल होणारा व्हिडिओ यूपीतील गोंडा जिल्ह्यातील भाजप कार्यालयातील आहे. या व्हिडिओत अमर किशोर कश्यप एका महिला कार्यकर्त्यासोबत अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले आणि त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली.
रात के 9.39 बजे हैं। Video उत्तर प्रदेश में गोंडा जिले के BJP दफ्तर की है। जिलाध्यक्ष अमर किशोर एक महिला को लेकर आते हैं। आलिंगन जिलाध्यक्ष जी CPR देते भी दिखते हैं, फिर एक फ्लोर ऊपर चले जाते हैं। वहां की फुटेज अभी प्राप्त नहीं हुई है।
जिलाध्यक्ष का बयान– "महिला कार्यकर्ता की… pic.twitter.com/vqRMTV14v3
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) May 25, 2025
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर कश्यप दिसत आहेत. तसेच एक महिलाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये आधी महिला पायऱ्या चढून येते. नंतर त्यांच्या पाठोपाठ अमर किशोर कश्यप देखील येतात. दोघेही थोडं पुढे चालत जातात आणि किशोर हे महिलेला कवेत घेतात. हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नंतर ते दोघेही वरील पायऱ्यांवर चढून जातात.
व्हिडिओ व्हायरल होताच सत्ताधारी आणि विरोधकांनी जिल्हाध्यक्षांवर टीकेची तोफ डागली. भाजपचे सरचिटणीस गोविंद नारायण शुक्ला यांनी कश्यप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Discussion about this post