अकोला : अकोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून दोन दिवसांत 10 कोटी रुपये न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी गंभीर धमकी मिळाली आहे. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून शुभम लोणकर या व्यक्तीने या धमकीचा फोन केला असून, कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.
यापूर्वी अकोल्यातील भाजप शहराध्यक्षांनाही धमकी मिळाल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातही बिश्नोई गँगकडून हल्ल्याची शक्यता वाढल्याचा मोठा धक्का बसला आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत माहिती दिली असून, स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र परवान्यासाठीही अर्ज केला आहे.
घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार पठाण यांच्याशी थेट संपर्क साधून सुरक्षा आणि मदतीचा आश्वासन दिले. तत्पूर्वी आमदारांना तातडीने Y श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. राजकीय क्षेत्रात वाढत चाललेली अशी धमक्यांची घटना चिंताजनक ठरली असून प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post