हिंगोली । राज्यात महिन्यांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून अशातच बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे. हिंगोलीत जन्मदात्या बापाकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार व बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील जुमडा शिवारात बापानेच १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे वडिलांनी वेळोवेळी बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती. त्या नंतर या घटनेची कुठे वाच्यता केली तर जीवे मारून टाकू अशी धमकी आरोपी बापाने मुलीसह तीच्या आईला दिल्याने या घटनेची कुठेही वाच्यता झाली नव्हती.
मात्र अखेर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये या अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली आणि या अत्याचाराच बिंग फुटले. प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या या अल्पवयीन मुलीने आपला विवाह झाल्यानंतर दोन महिन्यात अपघातामध्ये पतीचे निधन झाले असल्याची माहिती दिली होती.















Discussion about this post