मुंबई : देशातील काही राज्यांवर सध्या नवीन संकट ओढवून आले आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले ते पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या समुद्रकिनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मान्सून पुढील 24 तासांमध्ये केरळ आणि तमिळनाडूचा भाग व्यापून कर्नाटक आणि ईशान्येकडील राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Discussion about this post