राज्यात सध्या बर्ड फ्लूनं थैमान घातला असून यामुळे अनेक ठिकाणी हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. बर्ड फ्लूची दहशत पसरल्यामुळे काही ठिकाणी चिकन विक्री बंद करण्यात आलीय
अगदी दोनच दिवसांपूर्वी रायगडमधील उरणमध्ये हजारो कोंबड्या दगावल्याची घटना ताजी असताना आता लातूरमध्येही जवळपास 4000 कोंबड्याचा मृत्यू झालाय..या कोंबड्यांची सॅम्पल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांत कुठे कुठे बर्ड फ्लूची लागण होऊन पक्षी आणि कोंबड्यांचा मृत्यू झालाय पाहुयात.
राज्यात बर्ड फ्लूचं थैमान
लातूरमधील ढाळेगावात 4200 कोंबड्यांचा मृत्यू
नागपुरातील कामठीजवळ पाच मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू
रायगडमधील उरण गावात 1237 कोंबड्यांचा मृत्यू
चिरनेरमध्ये दीड हजार कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण
उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक कावळ्यांचा मृत्यू
बर्ड फ्लू बाधित चिकन खाल्ल्याने नागपुरात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू
दुसरीकडे बर्ड फ्लू आता मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यापर्यंत पोहोचलाय.ठाण्यातही जवळपास 21 कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असून या परिसरात रहाणाऱ्या १७५ जणांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत ज्याठिकाणी पादुर्भाव झाला आहे तिथे कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदीही घालण्यात आली असून चिकनची दुकानंही बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत
Discussion about this post