मुंबई : अरबी समुद्रात बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून पुढील काही तासांत हे वादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळचा फटका राज्यातील काही भागाला बसण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर व्यतिरिक्त कोकणातील किनारपट्टी भागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
L
मच्छिमारांना मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. पुढील 48 तासांत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हे चक्रीवादळ 8,9 आणि 10 जूनला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार आहे. कोकण, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर 8 ते 10 जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Discussion about this post