बिलासपूर :छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे. कोरोबा-पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांची जोरदार धडक झाली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार किमान 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात बिलासपूर–कटनी रेल्वे विभागातील लाल खदान परिसरात झाला. धडकेनंतर काही डबे रुळावरून घसरले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र *रेल्वे विभागाने चौकशी सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.















Discussion about this post