चाळीसगाव । जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिलाखेड गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. देवी अहिल्या होळकर उड्डाणपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरून खाली कोसळला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत दोन्ही गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
Discussion about this post