जळगाव । महामार्गावरील तरसोद ते नशिराबाद दरम्यान ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. योगेश भास्कर ढाके (४५, रा. सदोबा नगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश भास्कर ढाके हे जळगावात पत्नी, दोन मुली, भाऊ यांच्यासह राहत होते. नशिराबाद येथील एका पेट्रोलपंपावर कामाला होते. शुक्रवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एमएच १९, डीपी ४६६०) घरी परतत होते. नशिराबादपासून काही अंतरावर आल्यानंतर समोरून राँग साईडने एक ट्रक (क्र. एमएच १८, बीजी २९३७) नशिराबादकडे जात होता. या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ढाके हे बाजूला फेकले गेले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी ढाके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योगेश ढाके याना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post