नवी दिल्ली । बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वेला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे तब्बल २१ डब्बे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत.
एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, दानापूर रेल्वे विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
#WATCH | Bihar: Morning visuals from the Raghunathpur station in Buxar, where 21 coaches of the North East Express train derailed last night
4 people died and several got injured in the incident. pic.twitter.com/aiZZOYpfCc
— ANI (@ANI) October 12, 2023
या अपघाताचे वृत्त कळताच वैद्यकीय पथक आणि अधिकाऱ्यांसह अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झाले आहे. लोकांच्या सोयीसाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. रेल्वेने प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. पटनासाठी – 9771449971, दानापूरसाठी – 8905697493, ARA साठी – 8306182542 आणि COML CNL साठी – 7759070004. या वर्षी बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातात किमान 293 लोकांचा मृत्यू झाला आणि 800 हून अधिक लोक जखमी झाले. .
Discussion about this post