मुंबई । शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र या प्रकरणात ३४ याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे ६ निकाल लागणार आहेत.
२१ ते ३१ डिसेंबरपर्यंत या निकालाचे लेखन अशक्य आहे. त्यामुळे विधीमंडळाकडून वेळ मागवून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विधीमंडळाची ही मागणी मान्य करत १० जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणाचा १० जानेवारीपर्यंत निर्णय द्या.. असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
यामुळे सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा दिला आहे. राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.















Discussion about this post