पुणे : भावी शिक्षकांसाठी चांगली बातमी असून आता राज्यातील ११ हजार ८५ उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गेल्या २० वर्षांतील ही राज्यात सर्वात मोठी शिक्षक भरती आहे. या भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून शिक्षकांच्या २१ हजार ६७८पैकी १६ हजार ७९९ पदे मुलाखतीशिवाय होती. त्यातील ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून, शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
गदपत्रांची पडताळणी करीत शाळांवर नियुक्ती दिली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. यामुळे अनेक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. मुलाखतीशिवाय १६,७९९ मधील ५,७१७ पदांसाठी शिफारस केलेली नाही. आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक (१५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे २,३५७ जागा व अंशकालीन (१० टक्के) उमेदवार नसल्यामुळे १,५३६ जागा तसेच खेळाडू (५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे ५६८ जागा रिक्त राहिल्या आहेत.
पहिल्या टप्यात पवित्र पोर्टलवर
नोंद केलेल्या जिल्हा परिषद १२ हजार ५२२, मनपा २ हजार ९५१, नगरपालिका ४७७, खासगी शैक्षणिक संस्था – ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती आल्या. मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह ४ हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही होईल.















Discussion about this post