मुंबई । सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं आहे. आणखी तीन टप्प्याचं राज्यातील मतदान बाकी आहे. त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि वंचितच्या आघाडी संदर्भात सर्वात मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते. तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागातही आम्हाला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावे लागेल की, बळीचा बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
Discussion about this post