नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती CAGच्या अहवालातुन समोर आली आहे. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
कॅगने आपल्या अहवालात ७ प्रकल्पांमध्ये गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. यामध्ये भारतमाला प्रकल्प, आयुषमान भारत, अयोध्या विकास प्रकल्प, पेन्शनचा निधी, हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स, द्वारका एक्स्प्रेस वे, टोल घोटाळा या प्रकल्पांचा समावेश आहे. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत.
या योजनांवर कॅगचे ताशेरे…
भारतमाला प्रकल्पाचा खर्च 15.37 कोटी रुपयांववरून 32 कोटी दाखवण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ 5 टोलनाक्यांवर 132 कोटींची तूट
आयुष्यमान भारत योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल केंद्रावरून नोंद
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारा दरम्यान मृत झालेलाया 88 हजार रुग्णांचे बिल पास केले.
अयोध्या विकास प्रकल्पात कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन रम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विक्री करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा तसेच अपंगाच्या पेन्शनचा निधी स्वच्छ भारत योजनेचे फलक लावण्यासाठी वळवले.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात सदोष इंजिन विकसित केल्यामुळे 154 कोटींचे नुकसान
द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रति किलोमीटर 18 कोटींवरून 250 कोटींवर दाखवला.
Discussion about this post