मुंबई । शिवसेनेच्या नावावरून आणि पारंपारिक धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमधील तीन वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी पार पडणार होती.मात्र सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादासाठी वेळ मागितल्यानंतर कोर्टाने ही सुनावणी येत्या १२ नोव्हेंबरला होणार असल्याचं म्हटलं
आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. सिब्बल यांनी जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी केली.
मात्र दुसरे वकील वारंवार मध्यस्थी करत असल्याने सिब्बल यांनी त्यांना थांबवले. आधीच खूप वेळ गेलेला आहे, आता सुनावणी घ्या अशी मागणी केली.यावेळी कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने येत्या १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होईल असे सांगत आजची सुनावणी संपली, असे जाहीर केले.
त्यामुळे आता या प्रकरणावर १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. यानंतर ‘खरी शिवसेना कोणाची’ या मुद्द्यावर अंतिम फैसला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.















Discussion about this post