मुंबई । बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानबद्दल मोठी बातमी येत आहे. सैफला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आहे.या बातमीने सैफचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच त्यांच्या आवडत्या स्टारबद्दल चिंता व्यक्त केली.
सैफच्या तब्येतीचीही माहिती समोर आली आहे. सैफ अली खान याच्या गुडघे आणि खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफच्या गुडघ्याची सर्जरी पार पडली आहे. यावेळी करीना आपल्या पतीसोबत रुग्णालयात आहे.
सैफ अली खानला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. करीना कपूरने देखील सोशल मीडियावर अभिनेत्याच्या तब्येतीचे अपडेट दिलेले नाही. सैफच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिनेत्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने त्याला काही दिवस रुग्णालयात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
सैफ अली खानच्या दुखापतीबद्दल बोलायचे झाले तर, शुटिंगदरम्यान अभिनेता अनेकवेळा जखमी झाला आहे. 2016 मध्ये आलेल्या ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही तो जखमी झाला होता. चित्रपटादरम्यान सैफच्या अंगठ्याला दुखापत झाली, त्यानंतर अभिनेत्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. ‘क्या कहना’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका दृश्यादरम्यान अभिनेता गंभीर जखमी झाला होता. त्यांना अनेक दिवस रुग्णालयात काढावे लागले.
Discussion about this post