पुणे । सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत आहे. याच दरम्यान दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पावसामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचू न शकल्यास त्यांना परीक्षा देता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या परिस्थितीत जर पुरवणी परीक्षेसाठी दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता नाही आले तर त्यांनी पुन्हा परीक्षा देता येणार आहे.
दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा दुपारी तीन वाजता होणारा पेपर मंडळाकडून रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊनच दुपारचा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे.
दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा उद्या होणारा पेपरदेखील आम्ही रद्द करु, असे सांगण्यात आले आहे. राज्यभरात आज पुरवणी परीक्षा होत असल्याने सकाळी ११ वाजताचा पेपर रद्द करता येणार नसल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे. आज सकाळी दहावी पुरवणी परीक्षेचा सायन्सचा पेपर तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर आहे.















Discussion about this post