नवी दिल्ली : देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यात तीन राज्यात म्हणजेच राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभेत भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. यात विजयी झालेल्या भाजपच्या 10 खासदारांनी राजीनामा दिला आहे.
भाजपने तब्बल २१ खासदारांना या रिंगणात उतरवले होते. यातील १२ खासदारांनी विजय मिळवला तर ९ जणांचा पराभव झाला आहे. विधानसभेत विजयी झालेल्या १० खासदारांनी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय.
जे खासदार विधानसभेच्या निवडणुकीत जिंकलेत त्यांनी आज पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर या खासदारांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्यां खासदारांमध्ये खासदार किरोरी लाल मीना, राज्यवर्धन सिंह राठोड, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप, रीती पाठक, अरुण साओ, गोमती साई, दिया कुमारी आणि किरोनी लाल मीना यांनी आपला राजीनामा आज लोकसभा अध्यक्षांकडे दिला.
तर बाबा बालक नाथ आणि रेणुका सिंह यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाहीये. हे दोन्ही खासदार लवकरच आपला राजीनामा देणार आहे. दरम्यान खासदारांना राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत उतरवल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती यांची भेट घेत या खासदारांनी आपला राजीनामा दिला.















Discussion about this post