मुंबई । सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. या काळात सरकारकडून महागाई कमी करण्याचे प्रयत्न करीत असली तरी दुसरीकडे सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. सध्या डाळींच्या दरात मोठी वाढ झालीय. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतोय. गेल्या काही दिवसांत तूरडाळ आणि मूगडाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे.
तुरडाळीचे नवीन पीक नोव्हेंबर महिन्यात येते. यंदा हे पीक सात टक्के जास्त आले आहे. मात्र, बाजारातील वाढत्या मागणीमुळे तुरडाळीच्या किंमती वाढवण्यात आल्या आहे. तुरीच्या डाळीनं 170 रुपयांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना तुरीच्या डाळीची खरेदी परवडत नसल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन ते तीन दिवसात डाळीच्या किंमतीत सात आठ रुपयांची वाढ झालीय. तर महिनाभराचा विचार केला तर डाळींच्या किंमतीत 20 रुपयांची वाढ झालीय. तसेच हरभरा आणि मसूर डाळीच्या दरातही वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Discussion about this post