मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरू असून अशातच उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. ५०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि काँग्रेसची साथ सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्रमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
अक्कलकुवा विधानसभेत काँग्रेस आणि भाजपला खिंडार पडलं आहे. निवडणुकीपूर्वी ९० टक्के पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आमदार आमश्या पाडवींनी विधान केले. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील तब्बल ५०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांचा उपस्थितीत भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटात वाढत्या पक्षप्रवेशामुळे येत्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची ताकद अधिक वाढणार असल्याचे आमदार आमश्या पाडवींनी स्पष्ट केले. स्थानिक सवराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे अक्कलकुवामध्ये शिंदेगटाची ताकद वाढली आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांनी पदांचे सामूहिक राजीनामे दिले. हे सर्वजण शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील लांडगे, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज गुंदेचा आणि महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे हे सर्व पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.















Discussion about this post