सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे च्यावर तुफान हल्ला केला. “कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?” असं म्हणते भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप केला. छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना समजूनही सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणून ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे.
यशवंतराव चव्हाणांचा आमच्यावर प्रभाव आहे .मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण आम्ही मागितलं तर ते म्हणतात आमची मुलं गुरु ढोरं आहेत का? ओबीसी लेकांरांचा भुजबळांनी अपमान केला आहे. हा माणूस राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही. आम्ही राज्यात शांतता राखू .आपल्यात झुंज लावून राजकिय फायदा घेतील. त्यामुळे दोन्ही समाजांनी सावध राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
Discussion about this post