भुसावळ । शहरातील काझी प्लॉटमधील रहिवासी तरुणाने शहरालगतच्या पुलावरून तापी नदीत उडी मारली. हर्षल विलास विसपुते (वय ३२) असं या तरुणाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
मजुरीची कामे करणारा हर्षल तापी नदीच्या पुलावर आला. यानंतर त्याने पुलावरून खाली नदीत उडी मारली. हा प्रकार रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी हा प्रकार पाहिला. दरम्यान, नदीत उडी घेण्याआधी हर्षलने त्याचा मोबाइल पुलावर ठेवला होता. यामुळे हा प्रकार उघड झाल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी आले.
या प्रकारानंतर तापीच्या पुलावर गर्दी होऊन काही वेळ वाहतूक कोंडी झाली. दरम्यान शेळगाव बॅरेजचे दरवाजे बंद असल्याने तापी नदीत बॅकवॉटरचा फुगवटा तयार झालेला आहे. यामुळे शोधकार्यात अडथळे आले.















Discussion about this post