भुसावळ : भुसावळ तालुक्यात एक रात्रीतून तीन खून झाल्याची घटना समोर आलीय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे
जळगाव जिल्ह्यात मागील गगेल्या काही काळात गुन्हेगारीने डोकं वर काढले असून गुन्हेगारी रोखण्यासाठी धडक कारवाया केल्या जात आहे. मात्र अशातच भुसावळ नजीक काल रात्री अकरा वाजेनंतर कंडारी गावात भयंकर घटना घडली. यात शांताराम भोलानाथ साळुंखे आणि राकेश भोलानाथ साळुंखे या दोन भावंडांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांची प्रकृती देखील गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच, भुसावळ शहरात आज पहाटेच्या सुमारास चमेल नगराजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ निखील राजपूत याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एकाच रात्रीतून तीन खून झाल्याने परिसर हादरला आहे.
Discussion about this post