भुसावळ रेल्वे स्थानकवरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना चक्क पैशांनी भरलेली बॅग सापडली. पण पोलिसांनी बॅगेतील नोटा तपासल्या असता त्या नकली निघाल्या. भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन जणांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांना त्यांच्यावर संशय आला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींची बॅग तपासली असताना त्यांना बॅगेत नोटा आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी एकाला जागीच ताब्यात घेतलं. मात्र दुसरा संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरला.याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयताकडून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन जण संशयास्पद पद्धतीने फिरत होते. यावेळी पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी आरोपींच्या बॅगेची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या बॅगेत जवळपास एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या. दोघही जण मलकापूर येथून भुसावळला आले होते. पण रेल्वे स्थानकावर उतरताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
पोलिसांना संशय येताच एक संशयित फरार झाला. तर दुसऱ्या संशयताला पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं. पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरील एक नोट खरी तर बाकी बंडलमध्ये चिल्ड्रन बँक लिहिलेल्या नकली नोटा होत्या. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयताकडून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
Discussion about this post