भुसावळातून एक धक्कादायक घटना समोर आलीय, रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या करून मृतदेह दफन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुकेश प्रकाश भालेराव (32, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) असं मृताचे नाव असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
मृत मुकेश भालेराव विरोधात अनेक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे तर मध्यंतरी त्यास स्थानबद्धदेखील करण्यात आले शिवाय हद्दपारीची कारवाईदेखील त्याच्यावर करण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली व खून उघडकीस न येण्यासाठी तापी नदीजवळील निर्जनस्थळी पुरण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
Discussion about this post