जळगाव | चाळीसगाव स्थानकावर यार्ड रिमोल्डिंगच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात आला असून, त्यासाठी भुसावळहुन धावणाऱ्या दोन मेमू गाड्यासह बडनेरा ते नाशिक रोड जाणारी मेमुदेखील रद्द झाली आहे. या गाड्या आज म्हणजेच ७ मार्च ते १४ मार्च पर्यंत रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे.
भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर यार्डातील कामामुळे ब्लॉक घेण्यात येत असून यामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
रद्द झालेल्या गाड्या असे
1) गाडी क्र.11114 अप,भुसावळ — देवळाली मेमू दि.07/03/2024 गुरुवार रोजी भुसावळ हुन रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी क्र.11113 डाऊन,देवळाली — भुसावळ मेमू दि.08/03/2024 शुक्रवार रोजी देवळाली हुन रद्द करण्यात आली आहे.
3) गाडी क्र.01211 अप आणि 01212 डाऊन,बडनेरा — नाशिक रोड — बडनेरा मेमू दि.07/03/2024 गुरुवार रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.
4) गाडी क्र.11120 अप,भुसावळ — ईगतपुरी मेमू दि.07/03/2024 गुरुवार रोजी भुसावळ हुन रद्द करण्यात आली आहे.
5) गाडी क्र.11119 डाऊन,ईगतपुरी — भुसावळ मेमू दि.08/03/2024 शुक्रवार रोजी ईगतपुरी हुन रद्द करण्यात आली आहे.
Discussion about this post