भुसावळ : भुसावळ विभागातून जाणार्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी वेळेच्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
असे आहेत गाड्यांच्या वेळेत बदल
गाडी क्रमांक 20706 मुंबई ते जालना वंदेभारत एक्सप्रेस नाशिक स्थानकात आगमन वेळ दुपारी 4.18 येईल तर 4.20 वाजता सुटेल तर मनमाड स्थानक येथे आगमन वेळ सायंकाळी 5.18 आणि सुटण्याची वेळ 5.20 असेल. गाडी क्रमांक 11025 पुणे ते अमरावती हुतात्मा एक्सप्रेस भुसावळ स्थानक येथे आगमन वेळ रात्री 8.30 येईल व 8.35 वाजता सुटेल.
गाडी क्रमांक 11026 अमरावती ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी भुसावळ स्थानकावर रात्री 2.20 वाजता येईल व 2.25 वाजता सुटेल. जळगाव स्थानकावर ती रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी पोहचेल व 2 वाजून 52 मिनिटांनी सुटेल.पाचोरा स्थानकावर रात्री 3.23, कजगांव स्थानकावर 3.44, चाळीसगांव स्थानकावर 3.58 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 12072 हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस नाशिकरोड स्थानकावर दुपारी 12.45 पोहचेल, गाडी क्रमांक 12108 सीतापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस नाशिक स्थानकावर सायंकाळी 5.47 वाजता पोहचून 5.50 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 22123 पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस नांदुरा स्टेशनवर रात्री 11 वाजून 44 मिनिटांनी पोहचेल. अकोला स्थानकावर ही गाडी मध्यरात्री 12.45 वाजता पोहचून 12.47 वाजता रवाना होईल. गाडी क्रमांक 12187 जबलपूर-मुंबई गरिबरथ एक्सप्रेस नाशिकरोड स्थानकावर सकाळी 7.42 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 12618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकावर पहाटे 2.15 वाजता पोहोचणार आहे.















Discussion about this post