भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही विशेष गाड्यांचा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
या गाड्यांच्या कालावधीत वाढ
गाडी क्र. ०१०२५ दादर-बलिया त्रि- साप्ताहिक विशेष गाडी आता १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत तसेच क्र. ०१०२६ बलिया-दादर त्रि-साप्ताहिक विशेष गाडी आता ३ एप्रिल ते ३ जूनपर्यंत वाढविण्यात येत आहे.
गाडी क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर ही आठवड्यातून ४ दिवस असलेल्या गाडीची मुदत आता २ एप्रिल ते ३० जूनपर्यंत तर क्र. ०१०२८ गोरखपूर- दादर ही विशेष गाडीची मुदत ४ एप्रिल ते २ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. क्र. ०११३९ नागपूर-मडगांव ही विशेष गाडी आता ३ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावणार आहे.
बडनेरा- नाशिक नियमित अनारक्षित विशेष क्र. ०१२११ बडनेरा-नाशिक विशेष गाडीची मुदत १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत तर क्र. ०१२१२ नाशिक-बडनेरा या गाडीची मुदत १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे















Discussion about this post