भुसावळ । मध्य रेल्वेने एप्रिलपासून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून विशेष या गाड्या भुसावळ मार्गे धावणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या गाड्या सुरु होतील
यात, क्र. ०१०५३ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष गाडी ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४:०५ वाजता बनारस पोहचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, ज्योनाथपूर आणि वाराणसी असे थांबे असतील.
क्र. ०१०४५ लोकमान्य टिळक टर्मिनस प्रयागराज साप्ताहिक विशेष गाडी २ एप्रिल ते २५ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल. या गाडीला कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना आणि माणिकपूर इथे थांबे असतील.
क्र. ०११२३ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर साप्ताहिक विशेष गाडी ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी मुंबई येथून २२:१५ वाजता सुटेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई, ओराई, कानपूर, लखनौ, बाराबंकी, गोंडा आणि बस्ती या ठिकाणी थांबे असतील.
क्रमांक ०१४०९ लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत सोमवार आणि शनिवार रोजी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा येथे थांबे असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस समस्तीपूर साप्ताहिक विशेष गाडी ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर इथे थांबे असतील.
Discussion about this post