भुसावळ । शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगर जवळ दोन संशयित फिरत होते. बाजारपेठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस असा ५१ हजारांचा मुद्देमाल सापडला.
पोलिसांनी मुकेश मोहन अटवाल (वय २०, रा. वाल्मीक नगर) आणि यश किरण बोयत (वय २२, रा. अंजली हॉस्पिटल परिसर, तनारिका हाँटेलजवळ, भुसावळ) यांना अटक केली आहे.
शहरातील वांजोळा रस्त्यावरील प्रेरणानगर फाट्याजवळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोघां ताब्यात घेतले. यातील पकडलेल्या दोन्ही इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतूस असे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
Discussion about this post