मुंबई । महायुतीचा सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसापूर्वी नागपुरात पार पडला. यावेळी अनेक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहे. यात अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ देखील नाराज असून त्यांनी यातच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका. तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत”, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.
“काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण मला मंत्री केलं नाही. मंत्रिपद अनेकदा मिळाली. त्यामुळे आता नाही भेटलं, त्याचा काही वाद नाही. मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो, आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं.
1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका. तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी पवारांच्या सोबत गेलो”, असा मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. “प्रश्न मंत्रीपदाचा अजिबात नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. पण वादा आहे ना? मी कुठेही जाणार नाही. उद्या मी सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहे मग बघू. असं भुजबळ म्हणाले.















Discussion about this post