जळगाव । पुणे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र भोसरी प्रकरणात कोर्टाने एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला. त्यांना या प्रकरणी नियमित जामीन मंजुर करण्यात आला आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला आहे. एकनाथ खडसे यांच्यविरोधात ईडीने (ED) दाखल केलेल्या भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला आहे.यापुर्वी खडसे यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजुर केला होता. आजच्या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे. एकनाथ खडसेंचे वकिल मोहन टेकावडे यांनी बाबतची अधिक माहिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महसुल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.३.१ कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी पुण्यातील बंड गार्डन पोलिसांत खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
Discussion about this post