जळगाव । लग्न सोहळ्यात एका तरुणाला चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार भोलाणे गावात घडला होता. या मारहाणीच्या घटनेनंतर अपमान सहन न झालेल्या तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.भूषण लक्ष्मण कोळी (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत जळगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भोलाणे (ता. जळगाव) येथील भूषण कोळी हा आई- वडील व लहान भावासोबत भोलाणे येथे वास्तव्यास होता. १७ फेब्रुवारीला गावात लग्न असल्याने भूषण हा त्या लग्न सोहळ्यात होता. दरम्यान मध्यरात्रीनंतर गावातील तरूणांसोबत त्याचा वाद झाला. या वादात गावातील स्वप्नील गोकूळ कोळी, गोविंदा जगन कोळी, कृष्णा ऊर्फ अरुण कोळी आणि किरण गणेश कोळी या चौघांनी त्याला मारहाण केली.
काही चुकले नसतांना सर्वांसमक्ष झालेल्या मारहाणीच्या अपमानातून भूषणने गळफास घेत आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांची तक्रार आहे. भूषणचे काका जनार्दन श्यामराव कोळी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले दिवस उजाडल्यावरही भूषण बाहेर कसा येत नाही. म्हणून कुटुंबीयांनी पाहिले असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. जळगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Discussion about this post