अमरावती : देशात रस्ते प्रमाण वाढत असून शासनाकडून अनेक सुरक्षा उपाय सुरु केल्यानंतरही रस्ते अपघातांची संख्या कमी होत नाही. अशातच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर रोडवर सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात झाला. त्यात चार तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत.
त्यांची बस नांदगाव खंडेश्वरजवळ असणाऱ्या शिंगणापूर गावाजवळ होती. त्यावेळी सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बसमध्ये अपघात झाला. मिनी बसमध्ये बसलेल्या चौघ तरुणांचा मृत्यू झाला. तसेच दहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे. नांदगाव खंडेश्वर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या चौघ तरुणांची नावे अद्याप समजू शकली नाही. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिमेंट काँक्रिट मिक्सर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे.
Discussion about this post