जळगाव । सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते मंडळींचा प्रचार सभा शिगेला पोहोचला असून याच दरम्यान अभिनेता-राजकारणी गोविंदाबाबत मोठी बातमी समोर आलीय.
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या रॅली दरम्यान, गोविंदा यांची प्रकृती खालावली. तब्येत बिघडल्यानंतर गोविंदा रोड शो मध्येच सोडून मुंबईला परतला. अभिनेत्याची प्रकृती खालावल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील खळबळ माजली. दरम्यान अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. पण यावर अद्याप गोविंदाने अधिकृत वक्तव्य केलं नाही.
रिपोर्टनुसार, जळगाव येथील मुक्ताई नगर, बोदवड, पाचोरा, चोपडा येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी गोविंदा प्रचार करत होता. तेव्हा अचानक गोविंदाच्या छातीत वेदना होऊ लागल्या. छातीत वेदना होऊ लागल्यानंतर तात्काळ अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.1 ऑक्टोबर रोजी अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली होती. बंदूक साफ करत असताना गोळी लागली… अशी काही त्यानंतर समोर आली. गोळी लागल्यानंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ.रमेश अग्रवाल, गोविंदावर उपचार करत होती. गोविंदाला 8 ते 10 टाके पडल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली होती.संबंधित घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली आणि आणि याप्रकरणाची चौकशी सुरू केली.















Discussion about this post