बीड : पद्मपाणी प्रतिष्ठान तर्फे वर्ष 2024 करीता विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झाला. या सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक भरत शिरसाठ यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह , भारतीय संविधान देऊन उत्कृष्ट साहित्यिक म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या साहित्यिक वाटचालीचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोकाशाचे संपादक व प्रसिद्ध उद्योजक मा. विजयराज बंब उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पद्मपाणी संस्थेचे अध्यक्ष दिलीप तरकसे, डॉ. प्रज्ञा तरकसे, डॉ.राणी गायकवाड, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, प्रा. हौसराव पवार,ऍड. अनिल सुतार, प्रा.नामदेव तरकसे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
भरत शिरसाठ यांचे आतापर्यंत नऊ पुस्तक प्रकाशित आहेत. यामध्ये ‘शिक्षक कसा असावा?’, ‘सत्यशोधक आणि इतर कथा’, ‘बकध्यान’ हा कवितासंग्रह, ‘खैरलांजी- भीमा कोरेगाव आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’, ‘एक्स्पेक्टेशन अँड चॅलेंजेस इन टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. शासनाच्या विविध प्रोजेक्टवर त्यांनी इंग्रजीतून लेखन केलेले आहे. तसेच त्यांचे इंग्रजीतून रिसर्च पेपर पब्लिक झालेले आहेत.
‘विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘, ‘हरी आंबेडकर’, ‘भीमा कोरेगाव इतिहास- शौर्याचा प्रेरणा स्रोत’, ‘रियल स्टोरीज(इंग्रजी)’ इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.















Discussion about this post