मुंबई । काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे. 12 तारखेला गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. तर ही यात्रा मुलुंडला थांबणार दादर चैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे.
कार्यक्रम कसा असेल?
राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे. 12 तारखेला गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि आपल्या या मार्गाने जे वाडा मार्गाने ते आपल्याकडे येते आहे. 16 तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामातच 16 तारखेला ते संवाद करतील. ठाण्यात जांभळी नाका येथे सकाळी राहुल गांधी याची 16 तारखेला स्टेज नसणारी सभा होणार आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
भारत जोडो न्याय यात्रा ही मुलुंडला थांबणार दादर चैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे. 17 तारखेला सार्वत्रिक मीटिंग आघाडी म्हणून मुंबईला घेण्यात येणार आहे. देशामधील ज्या पद्धतीचे वातावरण सुरू आहे. त्यासाठी ही विशेष यात्रा आहे. 2014 पासून मोदी कारभार करत आहे, देशापुढे अनेक प्रश्न आहेत. लोकशाहीवर आघात होत आहे. या सर्व गोष्टीवरती न्याय मागणारी न्याय यात्रा आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.















Discussion about this post