तुम्ही सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. भारत सरकारच्याअंतर्गत अनेक कंपन्या आहेत. यापैकी एक भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती जाहीर काढली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. ट्रेनी इंजिनियर आणि प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही bel-india.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे. (Government Job)
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी आहे. या नोकरीसाठी फ्रेशर्सदेखील अर्ज करु शकतात. ट्रेनी इंजिनियर पदासाठी ३६ जागा रिक्त आहेत. प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी १२ जागा रिक्त आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई/बीटेक / बीएससी पदवी प्राप्त केलेली असावी. तर ४ वर्षांचा कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री कोर्स केलेला असावा. ट्रेनी इंजिनियर पदासाठी फ्रेशर्स अर्ज करु शकतात. प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. (BEL Recruitment)
ट्रेनी इंजिनियर पदासाठी कमाल वयोमर्यादा २८ असावी. तर प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा ३२ वर्ष आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ३०,००० ते ५५,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे.















Discussion about this post