भडगाव । तालुक्यातील कजगाव येथे आठदराेडेखाेरांनी दाेन घरांमध्ये सशस्त्र दराेडा टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी जवळपास साडे सहालाखांचा एेवज लंपास केला. दरम्यान पारोळारोड व रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली.
कजगाव येथील रेल्वे स्टेशन परिसरात राजश्रीनितीन देशमुख (वय ४८) ह्या अापल्याकुटुंबीयांसह राहतात. रविवारी रात्री त्या घरीएकट्याच होत्या. त्यांची सासू व मुलगा हेबाहेरगावी गेले होते. रात्री त्या झाेपलेल्या असतानादरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉकतोडून घरात प्रवेश केला. व राजश्री देशमुख यांनामारहाण करत पैशांची मागणी केली. तसेचघरातील सामान अस्ताव्यस्त केले. दरोडेखोरांच्याहाती येथे ३ लाखांचे दागिने व १ लाख रुपयांचीराेकड हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसऱ्या घटनेत दरोडेखोरांनी घरातील ६महिन्याचे लहान बाळ वेठीस धरूनपैशांची मागणी केली. दरोडेखोरांकडेतलवार, लोखंडी सळई अशी शस्त्रेहाेती. त्यांनी ६ महिन्याच्या लहानबाळाला तलवार लावून जिवे मारण्याचीधमकी देत पैशांची मागणी केली. येथूनदागिने व राेकड अडीच लाखांचा एेवजलुटल्याची माहीती समोर आली आहे.















Discussion about this post