जळगाव । घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून तरुणाला जबर मारहाण करत त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी बाप व भावाला अटक केली असून दोघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल लोटन पाटील वय (५४) धंदा शेती व पोलीस पाटील, रा. बाळद खु. ता भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) (वय २६)रा. बाळद खु ता. भडगांव जि. जळगांव हा घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो याकारणावरुन बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) यास धक्काबुक्की करुन लाथाबुक्कयांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच हातात लाकडी दांडके घेवून बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) याच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करुन त्यास जीवे ठार मारले. म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला बाप व भाऊ १)भारत राजेंद्र शिंदे, वय २२ वर्ष २) राजेंद्र रामचंद्र शिंदे, वय ४८ वर्ष, दोन्ही रा. बाळद खु ता. भडगांव जि.जळगांव. यांच्याविरुद्ध गु.र.न १२३/२०२५ बी.एन.एस.१०३(१), ११५ (२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण हे करीत आहे.
Discussion about this post