भडगाव । भडगाव तालुक्यातील गोंड गावात राहणाऱ्या चिमुकलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट रोजी समोर आली होती.अखेर या हत्याकांडाचा उलगडा झाला असून गावातील तरुणानेच मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील असे 19 वर्षीय आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी पोलीस त्याला गावात घेऊन आले असता गावकरी संतप्त झाले. गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत. तसेच पोलीस वाहनाचेही नुकसान झाले. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान काही दिवसापूर्वी मुलगी सापडत नसल्याने मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वप्निल पाटील याच्या कडब्याच्या कुट्टीतून दुर्गंधी येऊ लागली. दुर्गंधी सुटल्याने लोकांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण त्या कडब्याच्या कुट्टीत बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी तात्काळ याची माहिती देण्यात आली. कडब्याची कुट्टी स्वप्नील पाटील याच्या मालकीची असल्याने पोलिसांनी स्वप्नीलला संशयित ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच स्वप्नीलने गुन्ह्याची कबुली दिली.
Discussion about this post