भडगाव । झोपडीत बांधलेल्या ११ बकऱ्यांचा हिंस्त्रप्राण्याने फडशा पडल्याची घटना भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात घडलीय. या घटनेमुळे महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिचर्डे येथील नर्मदाबाई सहादु भिल यांच्या घरासमोरील झोपडीत रात्री बांधलेल्या ११ बकऱ्यांना हिंस्रप्राणीने फडसा पाडला. अतिशय गरीब परिस्थितीतुन नर्मदाबाई भिल यांनी एवढ्या ११ बकऱ्या एक एक रुपया जमवून एवढ्या घेतल्या होत्या. आज सकाळी वनविभागचे वनरक्षक दुर्गादास वानखेडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
यावेळी पिचर्डे पोलीस पाटील चेतना पाटील, उपसंरपच दिपक महाजन, ग्रामपंचायत सदस्य विजय महाजन, जगदीश पाटील, माजी उपसरपंच विनोद बोरसे, माजी पोली पाटील हेमराज महाजन, सोबत ज्ञानेश्वर भिल, किशोर सोनवणे, अरूण जोशी यांच्या सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. पंचनामा करून शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Discussion about this post