आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे सांगणार आहेत. अनेक वर्षांपासून पारंपारीक उपायांमध्ये या भाजीचा वापर केला जात आहे. शेवग्याच्या शेंगा व्हिटामीन, खनिज, एंटी ऑक्सिडेंट्सने परिपूर्ण असतात ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे मिळतात. आयुर्वेदात या भाजीचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे.
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने सांधेदुखीच्या वेदना दूर होतात. याशिवाय ब्लड शुगर कंट्रोल होण्यासही मदत होते. हार्ट हेल्थ मजबूत राहते याशिवाय इतर समस्यांपासूनही आराम मिळतो. भाजी, पराठा, सूप किंवा सांबार, डाळ यात तुम्ही शेवग्याच्या शेंगाचा समावेश करू शकता.
फार्म इझी. कॉमच्या रिपोर्टनुसार शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी-२ असते. यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि झिंक असते. यात १८ अमिनो एसिड्स असतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये येते.
शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. गॅस, पोट फुगण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामीन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली वाढते. सर्दी, फ्लू यांसारखे आजार उद्भवत नाहीत. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम असते ज्यामुळे हाडं मजबूत बनतात. ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत नाहीत.
सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरतो. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. वजन कमी होण्यासही मदत होते. आहारात शेवग्याच्या समावेश केल्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
Discussion about this post