कारल्याची भाजी किंवा कारल्याचा रस प्यायला अनेकांना आवडत नाही. पण, कारलं खाणं आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते ज्यांना किडनीच्या समस्या आहेत. त्यांनी दैनंदिन आयुष्यात कारल्याचा समावेश केला पाहिजे.
कडू कारल्यात फोलेट, झिंक, पोटॅशियम, आयरन, आणि व्हिटॅमिन सीचा समावेश असतो. 87% कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील अॅंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण वाढते, मेंदूचे कार्य सुधारते.
कारल्याचा रस प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात?
ब्लड शुगर लेव्हल
शरीरातील ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी तुम्ही कारल्याचा रस पिऊ शकता. याने टाईप २ डायबिटीजचे प्रमाण कमी होते. नियमित किमान १ कप या रसाचे सेवन केले पाहिजे.
त्वचेतील बदल
तुम्हाला नॅचरली ग्लोइंग स्कीन हवी असेल तर तुम्ही रोज कारल्याच्या रसाचे सेवन करू शकता. महागड्या प्रोडक्ट्सपेक्षा हा सगळ्यात सोपा उपाय राहील. अॅंटीऑक्सि़डंट्सने परिपुर्ण अशी ही भाजी आहे.
वजन कमी
तज्ज्ञांच्या मते तुम्ही कारल्याचा रस नियमित सेवन करत असाल तर तुमचा फॅट वाढत नाही. वजन नियंत्रणात राहते आणि विशेष डाएट करण्याचीही वेळ येत नाही.
कारल्याचा रस कसा बनवायचा?
सर्वप्रथम कारलं नीट धुवून घ्या. मग उभे बारिक काप करून घ्या. त्यातल्या बिया काढून टाकायला विसरू नका. उरलेला हिरवा भाग मिक्सरमध्ये टाका. त्यामध्ये पाणी ओता. चव वाढवण्यासाठी थोडा लिंबाचा रस, मीठ आणि अर्धा चमचा मध घाला. आता सर्व मिश्रण बारिक वाटून घ्या. वाटलेला रस गाळनीने गाळून तुमचा काढा तयार होईल. जर तुम्हाला काढ्याने पोटाच्या समस्या जाणवल्या तर त्याचे सेवन करणे टाळा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.















Discussion about this post