भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत सरकारची कंपनी बीईएमएल लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली असून ही भरती वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या वॉक इन इंटरव्ह्यूला जावे.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. त्यामुळे त्याआधीच अर्ज करावेत.
ही पदे भरली जाणार?
बीईएमएल लिमिटेडमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह- मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल इंजिनियर, ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, टेलिकम्युनिकेशन पदांसाठी भरती केली जाणार आहे.
बीईएमआलमध्ये एकूण १०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची वयोमर्यादा २९ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रं पडताळणी आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
बीईएममधील नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू १५ ते १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना पहिल्या वर्षी ३५००० रुपये, दुसऱ्या वर्षी ३७००० तर तिसऱ्या वर्षी ४०००० रुपये पगार मिळणार आहे.
बीईएमएलमधील ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई किंवा बीटेक केलेले असावे. मेकॅनिकल/ प्रोडक्शन / इंडस्ट्रीयल इंजिनियर/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजनियरिंग / इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी.याचसोबत उमेदवारांकडे संबंधित फील्डमध्ये २ वर्षांचा अनुभव असावा.
या नोकरीसाठी आधी तुम्हाला ऑनलाइनउ पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचे आहे.















Discussion about this post