नुकतेच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या नवरत्न कंपनीभारत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (BEL) मध्ये डेप्युटी इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ३५ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी १ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २८ वर्षे ठेवण्यात आली आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,००० ते १.४० लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार असून इतर भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.
पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई./बीटेक किंवा बीएससी पदवी घेतलेली असावी. सिव्हिल इंजिनियरिंग किंवा आर्किटेक्चर क्षेत्रातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाणार असून फ्रेशर्सनाही अर्ज करण्याची संधी आहे.
नियुक्ती सुरुवातीला ५ वर्षांसाठी करण्यात येणार असून पुढील काळात हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. इच्छुक उमेदवारांनी BEL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा.
यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर फोटो, कागदपत्र अपलोड करुन फॉर्म सबमिट करायचा आहे.















Discussion about this post