भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रोजेक्ट इंजिनियर आणि प्रोजेक्ट इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.
इंजिनियरिंगची पदवी असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ही करिअरच्या दृष्टीने उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. बीएचईएलमधील रिक्त पदांसाठी भरती इलेक्ट्रिकल, सिविल, मेकॅनिकलसह विविध विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२६ आहे.
बीएचईएलमध्ये एकूण १० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज १२ जानेवारीपर्यंत करु शकतात. त्यानंतर कागदपत्र १९ जानेवारीपर्यंत ऑफलाइन पद्धतीने पाठवावी लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने फुल टाइम इंजिनियरिंग /टेक्नोलॉजी डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन/कंप्यूटर सायन्समध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असावा. प्रोजेक्ट सुपरवायजर पदासाठी इंजिनियरिंग पदवी आणि २ वर्षांचा अनुभव असावा.
पगार
बीएचईएलमधील नोकरीसाठी प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी ९५००० रुपये पगार मिळणार आहे.दुसऱ्या वर्षी १ लाख रुपये पगार मिळणार. तर प्रोजेक्ट सुपरवायजर पदासाठी सुरुवातीला ४५००० रुपये पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी ४८००० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post