भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
भारत इलेक्ट्रॉनिक्समधील इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशियन पदासाठी ३० जागा रिक्त आहेत. इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी पदासाठी तुम्हाला २४,५०० ते ९०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत टेक्निशियन सी पदासाठी २१,५०० ते ८२,००० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.
पात्रता :
इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा. टेक्निशियन सी पदासाठी उमेदवारांनी एसएसएलसी, आयटीआयमध्ये १ वर्षांची अप्रेंटिसशिप केलेली असावी.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५९० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना bel-india.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवर ऑनलाइन अप्लाय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुमची सर्व माहिती भरावी. यानंतर तुमच्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.















Discussion about this post